मान्यवर
मुख्य कार्यकारी अधिकारी
जिल्हा परिषद नाशिक
प्रताप विमल प्रल्हाद पाटील
जिल्हा कार्यक्रम अधिकारी (म.बा.क.)
जि. प. नाशिक
महाराष्ट्र सरकारने जुन १९९३ मध्ये महिला व बाल विकास विभागाची स्वतंत्र प्रशासकीय विभाग म्हणून स्थापना केली. या विभागाचे प्रमुख उद्दिष्ट महिला आणि बालक यांचे जगणे, सुरक्षा, विकास आणि समाजात सहभाग या बाबी समग्रपणे झाल्या पाहिजेत यावर लक्ष केंद्रित करणे हा आहे.
एकात्मिक बाल विकास सेवा योजना कार्यक्रम केंद्र शासनाचे महिला व बाल विकास मंत्रालयाव्दारे चालविण्यात येणारा देशातील सर्वात मोठा व बहुउदेशीय कार्यक्रम आहे.
एकात्मिक बाल विकास सेवा योजना कार्यक्रम २ आक्टोंबर १९७५ पासुन राष्ट्रपिता महात्मा गांधीच्या १०६ व्या जयंती दिनी सुरु करण्यात आला आहे.
एकात्मिक बाल विकास सेवा योजना कार्यक्रम प्रारंभिक बाल्यावस्थेतील काळजी व विकासासाठी एक वेगळा कार्यक्रम आहे, ज्यामध्ये मागास,ग्रामीण ,शहरी व आदिवासी क्षेत्रात राहणा-या सहा वर्षाहून कमी वय असलेल्या बालकांच्या विकासासाठी व गर्भवती ,स्तनदा माता आणि किशोरींसाठी एकत्रीत सेवा दिल्या जातात.
बालकांची काळजी ,शारिरीक व मानसिक विकास तसेच आरोग्य व पोषण या संबंधीच्या गरजा एक दुस-यांवर अवलंबून आहेत आणि एकमेकाला परस्पर पुरक आहेत. या सिध्दांतावर एकात्मिक बाल विकास सेवा योजनेचा दृष्टीकोन आधारीत आहे.
एकात्मिक बाल विकास सेवा योजना समाजावर आधरीत कार्यक्रम आहे.हा कार्यक्रम कार्यन्वित करण्यासाठी समाजातील सदस्य जसे की पचायतीा राज, महिला मंडळ ,युवा मंडळ सदस्य, धार्मिक/स्थानिक नेता ,स्वयंसेवी संस्था,प्राथमिक विद्यालयाचे शिक्षक ,छत्यादींचे सक्रिय योगदान घेणे आवश्यक आहे.